अजमेर : नुपूर शर्माच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट करणारा अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि वादग्रस्त पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी सलमान चिश्ती याने सोशल मिडीयावर व्हिडीओ अपलोड करून नुपूर यांची हत्या करणाऱ्याला घर देणार असल्याचे त्याने म्हटले होते. पोलिसांनी सलमान चिश्तीची कसून चौकशी सुरू केली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिली. सलमान चिश्तीविरोधात १३ गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले. अजमेर पोलिसांनी चिश्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत.
चिश्तीच्या घरासह त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. चिश्तीकडून सोशल मीडियावर धमकी देणारा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने पावले उचलत सलमान चिश्तीला अटक केली. सलमान चिश्तीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. अजमेर ख्वाजा गरीब नवाज दर्गामध्ये आरोपी सलमान काम करत होता.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…