Share

साप्ताहिक राशिभविष्य, दि. ३ ते ९ जुलै २०२२

सुख-सुविधांमध्ये वाढ
मेष –महिन्याच्या सुरुवातीलाच सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. शुभ बातम्या मिळतील. बाजारामध्ये मंदी असली तरी आपल्याकडे लोकांचे येणे-जाणे वाढण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास भरपूर असणार आहे. जुनी काही राहिलेली कामे पूर्ण होतील. सप्ताहाच्या मध्यावधीत थोडा मानसिक तणाव राहणार आहे. तेव्हा आपण सावधानतेने पावले टाकली पाहिजेत. सामाजिकदृष्ट्या मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. सावध राहिले पाहिजे. प्रलोभनांपासून अलिप्त राहणे अत्यावश्यक ठरेल. इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
ऐश्वर्यात वृद्धी
वृषभ –या सप्ताहात ग्रहयोग आपणास अनुकूल असणार आहेत. तुम्ही विचार केलेली आणि नियोजित केलेली कामे त्याचप्रमाणे होणार आहेत. भौतिक सुखाबरोबरच ऐश्वर्य आणि संपन्नता वाढवणारा काळ आहे. आनंदात व मौजमजेत वेळ घालवणार आहात. घरातील वादळी वातावरण संपणार आहे. मुलांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. आपला मान, प्रतिष्ठा, सामाजिक स्तर उंचावणारा हा कालावधी असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. स्थिर संपत्ती खरेदी करू शकता. आनंदी आणि उत्साही राहाल.
प्रेमात यश
मिथुन – प्रेमी युगुलांसाठी हा कालावधी चांगला आहे. एखादी चांगली बातमी समजू शकते किंवा अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून आताचे वातावरण सुखदायक असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहाय्य मिळणार आहे. कामाची धावपळ असूनही आपणास उत्साह वाटेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. सप्ताहाच्या शेवटी उर्वरित कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती कराल. व्यावसायिक बदल पोषक ठरतील. सरकारी नोकरीत अधिकार वाढवून मिळतील. निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.
भाग्योदय होईल
कर्क – ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये नीरसता आली होती किंवा कंटाळवाणे जीवन वाटत होते, त्यांना आता आनंद आणि आशा निर्माण होणार आहे तसेच वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही. त्यांच्या सांगण्यावरून आपण एखादी महाग भेटवस्तूही त्यांना तुम्ही देऊ शकता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पूर्वीची येणी येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास संभवतो. संततीप्राप्तीचे शुभयोग आहेत. आपल्यासाठी भाग्याची दारे उघडणार आहेत. नोकरीत परिस्थिती समाधानकारक राहील. अपेक्षित घटना घडतील.
आर्थिक आलेख उंचावेल
सिंह – आपल्यासाठी हा काळ आर्थिक बाबतीत खूप चांगला राहणार आहे. दीर्घ मुदतीची गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये आपणास बराच फायदा होणार आहे. आपण अर्थप्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करणार आहात. पण आपणास कमी कष्टात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत कुटुंबात वाद-विवाद संभवतात, पण वडिलांकडून प्रत्यक्षात फायदा होण्याची आशा आहे. व्यापार-व्यवसायात चांगल्या परिस्थितीमुळे आर्थिक प्रगती होणार आहे.
सहकार्य मिळेल
कन्या – व्यापार व्यवसायामध्ये अपेक्षित आर्थिक फायदा होणार नाही. उत्पन्न कमी आणि जास्त खर्चामुळे आपली बचत खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक समस्या उद्भवल्यामुळे आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते. आर्थिक मदत मित्रमंडळींच्या वर्तुळातून उपलब्ध होईल. कुटुंबातून ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन, मदत मिळेल. नोकरीतील वातावरण सकारात्मक असेल. त्यामुळे आनंदी असाल. बदलत्या सरकारी धोरणांचा व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
प्रसन्नता व समाधान लाभेल
तूळ –परिवारामध्ये शांतीचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनामध्ये जे गैरसमज झाले होते ते दूर होतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळणार आहे. यामुळे आपले स्थान बळकट करणार आहात. आपले खाणे-पिणे आपण वेळेवर करावे, अन्यथा त्याचा परिणाम प्रकृतीस्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे. तसेच वेळेचे नियोजन करावे. कुसंगतीपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल. उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. मानसिक अस्वस्थता दूर होणार आहे. आर्थिक दृष्टीने समाधानी राहाल.
मानसन्मानात वृद्धी
वृश्चिक – व्यापारी, व्यावसायिकांना अतिशय चांगला कालावधी आहे. ज्यांचे व्यवसाय हॉटेल, रेस्टॉरंट अशा प्रकारचा व्यापार आहे, त्यांना अतिशय उत्तम. परदेशी प्रवासी येतील आणि इतरही व्यक्ती येऊन हॉटेल फूल असणार आहेत. कला क्षेत्रातील व्यक्तींनाही हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन प्रस्ताव येतील, कामे भरपूर प्रमाणात मिळतील, प्रसिद्धी भरपूर होईल. त्याचप्रमाणे अर्थार्जन वाढेल. ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत, त्यांना पण हा कालावधी चांगला असणार आहे. नोकरीमध्ये चांगली स्थिती असेल.
उत्तम कालावधी
धनु – हा चांगला कालावधी आहे. ज्या व्यक्ती शासकीय कामामध्ये आहेत, त्यांना प्रमोशन मिळू शकते. जे खासगी नोकरी करतात, त्यांना पगारवाढ मिळू शकते. आपल्यामध्ये चांगली क्षमता असल्यास मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नियुक्ती होऊ शकते. आपल्या कार्यकुशलतेमुळे कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. ज्या व्यक्तींचा व्यवसाय तयार कपडे, ब्युटी पार्लर याच्यासंबंधी आहे. त्यांना आताचा कालावधी चांगला सिद्ध होणार आहे. जर आपणास व्यापारामध्ये वाढ करायची असेल, तर काही प्रकारची जोखीम उचलावी लागणार आहे.
तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
मकर – भागीदारीमध्ये काही आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. भागीदाराच्या मतास उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल. आपली मते मर्यादित स्वरूपात ठेवा. ती इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. वैवाहिक आयुष्यामध्ये जर आपला जोडीदार नोकरी किंवा काही काम करत असेल, तर गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबद्दल थोडी सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे. व्यापार, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपला जोडीदार आपल्याला सहाय्य करणार आहे.
आर्थिक लाभ
कुंभ – राशीमधील शुभ ग्रहांमुळे शेअर बाजारांमध्ये फायदा होईल. जमीन-जुमल्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. मध्यस्थी यशस्वी होतील. यात्रा कंपनींना हा कालावधी व्यापारी दृष्टीने चांगला आहे. त्यात विदेशी प्रवास कंपन्यांना उत्तम कालावधी आहे. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, बिल्डिंग मटेरिअल संबंधित व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. सप्ताहाच्या मध्यावधीत नवीन घर खरेदी करण्याची शक्यता किंवा घरामध्ये नूतनीकरणाचे काम कराल. हा कालावधी आपणास आनंददायी ठरणार आहे.
सकारात्मक राहा
मीन – सरकारी अथवा खासगी स्वरूपाच्या नोकरीमध्ये आपले वरिष्ठ त्यांचे स्वतःचे काम तुमच्यावर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. आपणास वाटले तरी आपण त्यांना विरोध करू शकणार नाही. महिलांना सासरी वादविवादाला सामोरे जावे लागणार आहे. अशा वेळी आपण आपला आत्मविश्वास वाढवून धीराने समोर गेले पाहिजे. हा कालावधी जास्त चालणार नाही. त्यामुळे आपणास सकारात्मक दृष्टीने पुढे जावे लागणार आहे. व्यवसायात अचानक बदल करावे लागण्याची शक्यता आहे.

Recent Posts

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

11 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

19 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

56 minutes ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

1 hour ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

1 hour ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

3 hours ago