नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला वाढदिवसानिमित्त रविवारी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भज्जीचे खास मित्र असलेल्या सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगने हरभजनला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर हरभजनचे व्हिडीओ शेअर करत भज्जीला शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराज सिंगने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भज्जीसोबत घालवलेले खास क्षण दाखवले आहेत. युवराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक चाहत्यांनी हरभजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील सोशल मिडियावर हरभजनचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ २००१ मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या या सामन्यात भज्जीने भारतासाठी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेतली होती. त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर करून सचिनने हरभजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Happy B'day Harbhajan Singh 🎂
First Indian Who Took a Test Hattrick For India🇮🇳Enjoy Bhajji's Hattrick Vs Aus Historic Kolkata Test 2001💙 The Voice of Tony Greig.♥️#HarbhajanSingh @harbhajan_singhpic.twitter.com/RHdNwobf9x
— CrickeTendulkar 🇮🇳 (@CrickeTendulkar) July 3, 2022