मित्राने गैरफायदा घेतला, गर्भपात केला पण पश्चाताप नाही!

मुंबई : 'रेड्डी', 'सुलतान', 'जवानी जानेमन', 'सिटी ऑफ लाईफ' यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली आणि 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) हिने तिच्या मित्रानेच गैरफायदा घेतला परंतू नंतर मी गर्भपात केला. याचा मला अजिबात पश्चाताप होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.


लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गर्लफ्रेंडची अर्थात ‘कुक्कू’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कुब्रा सैत हिने नुकतेच 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लाँच केले आहे. या पुस्तकात अभिनेत्रीने असे अनेक खुलासे केले आहेत, हे वाचल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लैंगिक शोषण असो किंवा बॉडी शेमिंग असो, कुब्राने आपल्या पुस्तकात सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.


वयाच्या सतराव्या वर्षी झालेले शारीरिक शोषण आणि रेस्टॉरंट मालकाने घेतलेला गैरफायदा, या सगळ्या गोष्टी तिने या पुस्तकात मांडल्या आहेत. कुब्राने आपल्या पुस्तकात अनेक मोठे खुलासे केले आहेत. यातील एक खुलासा सर्वात धक्कादायक आहे, तो म्हणजे अभिनेत्रीचा गर्भपात देखील झाला होता.



या पुस्तकातील एका भागात कुब्राने सांगितलेय की, वन नाईट स्टँडनंतर तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. ती म्हणते की, हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि तिला त्याचा कोणताही पश्चाताप नाही. २०१३ मध्ये ती अंदमानला फिरायला गेली होती. त्यावेळी ही घटना घडली होती.


या पुस्तकात अभिनेत्रीने तिच्या २०१३च्या अंदमान ट्रीपची कहाणी शेअर केली आहे. कुब्रा म्हणते, ‘मी त्यावेळी ३० वर्षांची होते आणि स्कूबा डायव्हिंगनंतर स्वतःसाठी काही ड्रिंक्स घेण्यासाठी गेले होते. याच दरम्यान एका मित्रासोबत वन नाईट स्टँड घडला. आठवडाभरानंतर चाचणी केली असता, मी गरोदर असल्याचे मला कळले. मात्र, या बाळाला सांभाळण्याची माझी स्थिती नसल्याने, मी गर्भपाताचा निर्णय घेतला’. याबाबतचा खुलासा अभिनेत्री कुब्राने एका प्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना केला आहे.


‘वयाच्या २३व्या वर्षी लग्न करून, ३०व्या वर्षी मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांवरचा दबाव मला समजत नाही. हे एका अदृश्य नियम पुस्तकासारखे आहे. मी त्यासाठी तयार नाही हे मला माहीत आहे’, असे तिने म्हटले.


तसेच आपल्या आयुष्यात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आपल्याला पश्चात्ताप होत नसल्याचेही कुब्राने म्हटले आहे.


कुब्रा सैतने अभिनेता सलमान खानच्या 'रेड्डी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये तिने छोटीशी भूमिका होती. यानंतर ती 'सुलतान', 'जवानी जानेमन', 'सिटी ऑफ लाईफ' यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Comments
Add Comment

कांतारा चॅप्टर १ जगभरात धडाकेबाज ठरला! अवतार आणि टायटॅनिकलाही मागे टाकत ऋषभ शेट्टीने रचला इतिहास

दक्षिणेतील अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट सर्व स्तरातून प्रचंड प्रेम मिळवत आहे. त्याच्या

"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

मुंबई : बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक खास भेट दिली आहे.

कल्कीच्या सिक्वेलमध्ये आलिया दिसणार? चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड ग्लॅम दीपिका पादुकोण आणि बिग बी यांच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने २०२४

आमंत्रण नसतानाही बिग बींच्या बर्थडेला 'ती' आली अन् बाथरूममध्ये लपली!

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने सांगितला 'तो' भयानक किस्सा...

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण