महाड : राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले. या धक्कातंत्रामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सत्तासंघर्षाच्या या घडामोडींनंतरही शिवसेना नेते खासदार संजय राऊत पुन्हा शिंदेगटावर निशाणा साधत आहेत. यामुळे संतापलेल्या शिंदेगटाच्या आमदार पुत्राने थेट संजय राऊत यांना धमकी दिली आहे.
अलिबाग येथील मेळाव्यात संजय राऊत यांनी महाड येथे मेळावा घेणार असल्याचे म्हटले होते. आता, मी संजय राऊतांना आव्हान देतो की, त्यांनी सुरक्षेशिवाय महाडमध्ये येऊन दाखवावे. येथील शिवसैनिक त्यांना प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राऊतांना थेट धमकीच दिली आहे.
शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील यांनीही काल संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊतांसारख्या माणसांमुळे आम्हाला बंडखोर म्हटले जाते, पण आम्ही शिवसैनिकच आहोत, असे ते म्हणाले. त्यानंतर, आता बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या पुत्राने संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे.
यापूर्वी, रायगड जिल्ह्यातील ३ आमदारांच्या बंडखोरीविरुद्ध अलिबाग येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुड तालुक्यातून या मेळाव्यासाठी शिवसैनिकांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांवर त्यांच्या स्टाईलने टिका केली. शंभर गोठ्यातील शेण काढून आमदार महेंद्र दळवी शिवसेनेत आले होते. ते गेले, आता बैल बदलायची वेळ आल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तर, अनंत गीते यांनी भरत गोगावलेंना भूत संबोधले होते.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…