नवी दिल्ली : टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. त्याने स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे. नीरजने ८९.९४ मीटरच्या सुरुवातीच्या थ्रोसह आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. नीरजचा ९० मीटरचा टप्पा केवळ ६ सेमीने चुकला त्यामुळे तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे. नुकत्याच फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी ऍथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
नीरज चोप्राचा ९० मीटर थ्रो थोडक्याक चुकला. परंतु, राष्ट्रीय विक्रमासह त्याने या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेत त्याने प्रथमच पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले आहे. ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक विजेता अँडरसन पीटर्सनंतर दुसरे स्थान पटकावले. पीटर्सने ९०.३१ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
निरजने केलेल्या कामगिरीमुळे केंद्रीय क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अनुराग ठाकूर यांनी लिहिले, “ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला. २०२२ स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ८९.९४ मीटर भालाफेकून स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.” ठाकूर यांनी त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.
Olympic Champion @Neeraj_chopra1 sets the new National Record and Personal Best at 2022 #StockholmDL with a throw of 89.94m, finishing 2nd
Take a look at the record breaking throw! pic.twitter.com/r3X7IK7LSp
— Anurag Thakur (@ianuragthakur) July 1, 2022