मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आज मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी भरले होते, मात्र मध्यरात्री पाऊस थांबल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेला आहे. आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला ‘अलर्ट’वर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागील काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावली.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…