पुणे (वार्ताहर) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने मंगळवारी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये रात्री प्रवेश केला आहे. वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मंगळवारी निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांचे निरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. गेले अनेक वर्ष या स्नानाची परंपरा सुरू आहे.
कोळी समाज त्यांच्या होडीतून पालखी नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचे पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला. आळंदीतून प्रस्तान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घालण्यात आले.
त्यानंतर पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले आणि आता शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घालण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे पायवारी सोहळा होऊ शकला नाही. यंदा पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांसोबतच पालखी मार्गावरील लहान गावांमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…