Tuesday, April 22, 2025
Homeमहामुंबईघरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी

घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार पर्यावरण हित लक्षात घेत यंदा गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करू नये, त्या ऐवजी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन करावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले. तसेच कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा अधिक नसावी, अशी विनंती देखील महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यंदाचा गणेशोत्सव जवळ येवून ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गणेश भक्त, गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांना विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार पर्यावरणाच्या दृष्टीने आणि जल प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये घडवलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करू नये. कारण, प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीचे अनेक दुष्परिणाम आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना देखील धोका निर्माण होतो.

या सोबतच, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दिनांक १२ मे २०२० च्या नियमावलीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरास व विक्रीस बंदी आहे, त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीची विक्री किंवा खरेदी करू नये. गणेश भक्तांना विनंती करण्यात येते की, शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी. घरगुती गणेश मूर्ती ही २ फूटांपेक्षा जास्त उंच नसावी. असे केल्याने ह्या मूर्तींचे विसर्जन नजीकच्या कृत्रिम तलावामध्ये करणे सोयीस्कर होईल. गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -