२०३० पर्यत कचरामुक्तीचे लक्ष्य

मुंबई : मुंबईला जागतिक स्तरावर सर्वात स्वच्छ शहर बनवण्यासाठी पालिका ने 'व्हिजन २०३०' लाँच केले आहे. पुढील ८ वर्षांमध्ये शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कृती योजना केली आहे. शेकडो कोटी रूपये खर्च करूनही मुंबईतील कचऱ्याची समस्या कधी सुटणार हा एक मोठा प्रश्न आहे? शहरात दररोज ५,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार, महामंडळाला डंपिंग ग्राऊंडवरील अवलंबित्व कमी करून, स्त्रोतावर कचरा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.


त्यावर कारवाई करत, पालिकेने २०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या आणि व्यावसायिक परिसरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याठिकाणी ५० टक्के बल्क जनरेटर सुविधा आहे. दररोज १०० किलो कचराची या जनरेटरमध्ये विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. तरीही स्वतःच्या परिसरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. या करीता शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नागरीकांनी गेल्या वर्षी ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे 'व्हिजन २०३०चा मसुदा तयार करण्यात आला.


व्हिजन २०३०मध्ये विकेंद्रित कचरा व्यवस्थापन, वॉर्ड स्तरावर सुका आणि ओला कचरा वेगळा करणे, डंपिंग ग्राऊंडवरील अवलंबित्व कमी करणे या प्रकाराच्या योजना राबवल्या जाणार आहे. पुढील आठ वर्षात कचऱ्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर