अंत पाहू नका, ''जशास तसे उत्तर देऊ''; केसरकरांचा सरकारवर हल्लाबोल

गुवाहाटी : आमच्या भावनेचा अंत पाहू नका, यापुढे ''जशास तसे उत्तर देऊ''. एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते असल्याचा पुनरुच्चार बंडखोर आमदारांच्या वतीने बाजू मांडताना दीपक केसरकर यांनी केला.


फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असेही ते म्हणाले.


भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळत आहे. माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री १२ वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडले. फडणवीसांनी स्वत: हून आम्हाला संरक्षण दिले, असे दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.


दीपक केसरकर म्हणाले की, राऊतांच्या वक्तव्यामुळे मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहे. शरद पवारांनी तीन तीन वेळा शिवसेना फोडल्याचा धक्कादायक आरोपही केसरकर यांनी केला.


शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असे म्हटले जात आहे, पण या अफवा आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व