मुंबई : आमदारांवर कशाप्रकारे महाविकास आघाडीत अन्याय झाला हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे सध्या ट्विटरच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या भावना मांडत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले आहे. एकनाथ शिंदे यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
या व्हिडीओत शंभुराजे देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत आरोप केला आहे. राज्यमंत्री असूनदेखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही अशी व्यथा शंभुराजे देसाई यांनी मांडली आहे.
“माझ्यासोबत अनेक राज्यमंत्री सहकाऱ्यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवून दिले पाहिजेत अशी मागणी केली. पण अडीच वर्षात अधिकार मिळाले नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…