भुजबळांना कोरोनाची लागण ट्वीट करत दिली माहिती

मुंबई : राज्यात एकीकडे राजकीय सत्तानाट्य दिसत असताना दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट एकापाठोपाठ पॉझिटिव्ह येत आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्वीट करत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.


आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देताना भुजबळ यांनी ट्वीट केले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल, असे ते म्हणाले आहेत.


https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1541399059251924992

त्यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं सांगितले आहे. तसेच सर्वांनी कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व