मँगनीजच्या उत्पादनवाढीत कामगारांची भूमिका महत्त्वाची - गडकरी

  119

नागपूर (हिं.स.) : मॉईल एक नवरत्न कंपनी असून देशात गरजेपेक्षा कमी मँगनीजचे उत्पादन आहे. मँगनीजच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मॉईलमध्ये काम करणा-या कामगारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मँगनीज ओर इंडिया कंपनीतील कामगार संघटनांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मॉईलचे व्यवस्थापकीय संचालक चौधरी, तानाजी वनवे, योगेश वाडीभस्मे, रामअवतार देवांगन आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमात बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, विदर्भ, महाराष्ट्र, नागपूरचा विकास व्हावा, युवकांना काम मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा या भावनेतून विकास व्हावा. मॉईल ही एक रत्नांची कंपनी असून या कंपनीच्या प्रगतीचे, विकासाचे श्रेय कामगारांना आहे. आज ८० लाख टन मँगनीजची देशाला गरज आहे. यापैकी ३० लाख टनचे आपले उत्पादन आहे. ५५ लाख टन मँगनीज आपण आयात करतो. ही आयात बंद झाली पाहिजे यासाठी मँगनीजचे उत्पादन वाढवावे यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


मँगनीजचा साठा आज कमी आहे. कारण उत्पादन कमी आहे. जर उत्पादन वाढले तर रोजगार मिळेल. नफा जास्त होईल व कंपनीची प्रगती होईल. यासाठी मँगनीजच्या जास्तीत जास्त खाणी सुरु व्हावा असे सांगताना गडकरी म्हणाले - ११ खाणींजवळ ११ स्मार्ट व्हिलेज तयार व्हावेत. येथे कामगारांना आरोग्य, शैक्षणिक व अन्य सर्व सुविधा मिळाव्या. युनियनच्या नेत्यांनी ट्रेड युनियनचे काम करताना सर्वांचे हित ज्यात आहे, अशा योजना आणाव्या. कामगारांच्या कल्याणाच्या योजनाही आणाव्या. संघटना कोणत्याही झेंड्याखाली काम करोत, पण कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही गडकरींनी केले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ