ठाकरे नाव न वापरता रस्त्यावर या.. निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर भाजप नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नशिबाने नेते झाले आहेत. त्यांचे स्वकर्तृत्व शून्य आहे. त्यांनी असे कुठले मोठे आंदोलन गाजवले आहे? असे कुठले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले आहेत? उद्धव ठाकरे म्हणतात ठाकरेंचे नाव वापरू नका. आम्ही उलट सांगतो उद्धव ठाकरेंना तुम्ही ठाकरे नाव न वापरता रस्त्यावर या… मग तुम्हाला तुमची किंमत कळेल, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. कुडाळ येथे एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


उद्धव ठाकरे तुम्ही स्वकर्तृत्वाने काही केले नाही. उद्धव ठाकरेंनी आमदारक्या वाटल्या नसत्या तर मुलगा निवडूनसुद्धा आला नसता. म्हणून जमिनीवर या, तुमचे स्वकर्तृत्व काही नाही. हवेत उडायचे बंद करा. महाराष्ट्रातील जनता सगळेच बघत आहे, असेही ते म्हणाले. पक्ष संपवण्याची कुणाची इच्छाच नसते. गुवाहटीला गेलेले स्वखुशीने गेले नाहीत. उद्धव ठाकरेंमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. आम्हीही खुशीने पक्ष सोडला नाही. यामागेही उद्धव ठाकरेच होते, असेही निलेश राणे म्हणाले.


पक्षनेतृत्वाला प्रत्येक नेत्याचे म्हणणे ऐकून घायचे असते. एकनाथ शिदेंसह सर्व आमदार पक्ष संपवण्यासाठी बाहेर पडले नाही. नारायण राणे बाहेर पडताना विरोधी पक्षनेता होते, कोणाला काय पाहिजे अजून. पण यांना इज्जत नको असेल तर एक ना एक दिवस असे होते. म्हणून पक्ष संपवणे महत्त्वाचे नाही तर स्वतःच्या कर्माने पक्ष संपत जातो, अशी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Comments
Add Comment

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील

व्‍यवस्‍थापन केंद्र स्‍थापन करण्‍यासाठी मेडट्रॉनिक इंडियासोबत ग्‍लेनेगल्‍स हॉस्पिटलसोबत काम करणार

मेडट्रॉनिक या आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनीने आज ग्‍लेनेगल्‍स हॉस्पिटल, मुंबईसोबत

उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली ५ कौशल्‍ये: लिंक्‍डइन

लिंक्‍डइन स्किल्‍स ऑन द राइज २०२६ च्‍या मते, एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्‍स, आयटी अँड सायबरसिक्‍युरिटी,

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने