राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा -नवनीत राणा

  93

अमरावती (हिं.स.) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना धोका असून, त्यांना सुरक्षा प्रदान करा, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबत खा. राणा यांनी शनिवारी एक व्हिडीओ जारी केला आहे.


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदारांना सुरक्षा आहे त्यांच्या कुटुंबीयांना नाही, असे व्यक्तव्य केले आहे. या व्यक्तव्याचा खा. राणा यांनी खरपूस समाचार घेतला. संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचे आहे? तुम्ही बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना मारणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर आमदार आहेत, ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते पाईक आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परंतु आजमितीला शिवसैनिक गुंडगर्दी करीत असून, आमदार, खासदारांच्या कार्यालयाची तोडफोड करीत आहेत. महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची राजवट संपुष्टात आणण्याची मागणी खा. नवनीत राणा यांनी केली.


एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक


एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार फोडले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना की शिंदेसेना? असा नवा वाद सुरू झाला आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक असल्याची पावती खा. नवनीत राणा यांनी दिली. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी