महाविकास आघाडीने अल्पमतात; सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला

  103

...तर एकनाथ शिंदेंना आरपीआयचे लोक देतील साथ


मुंबई (प्रतिनिधी) : ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकार आता अल्पमतात आले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा आधीकार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेंव्हा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल’, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले.


शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजप सोबत युती करावी, या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ‘राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाजपची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नाही’, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले असल्याची माहिती आठवले यांनी दिली.


‘एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडीची खेळी हा या अमदारांवर अन्याय ठरेल. तसेच या अमदारांवरील निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल. अशी चुकीची व घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बाजावतील. मात्र त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आणि कार्यालयांवर हल्ला करण्याची दादागिरीची, चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील. त्यांना साथ देतील, अशी ग्वाही यावेळी रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई