सरकार मुळातच अनैसर्गिक, उदयनराजेंचा मविआला टोला

मुंबई : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. 'महाविकास आघाडी स्थापनेपासून अनैसर्गिक आघाडी होती, स्थानिक कार्यकर्त्यांनाही ही आघाडी अडचणीची ठरत होती', अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


'महाविकास आघाडी सरकार हेच मुळात अनैसर्गिकरित्या तयार झाले होते. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने कौल दिला होता. अजुनही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना हे सरकार कायम ठेवायचे असेल. तर, त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरमधले शेवटचे काही महिने किंवा वर्ष उपभोगून घ्यावेत.' अशी टीका उदयनराजे यांनी केली.


पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यामुळे जर आज कोणी धमकी देत असतील, तर त्यांना समाज भीक घालणार नाही आणि नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.


'खरे तर, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित काम करू शकत नाहीत. कार्यकर्ते लोकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी मतदान करायला कसे सांगणार. ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अडचणीचीच आहे', असे उदयनराजे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे