मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या सागर कांबळे याने इंग्लिश खाडीमधील ३४ किमी अंतर १४ तास ४८ मिनिटांमध्ये पार केले. त्याने नुकतीच ही ऐतिहासिक कामगिरी केली.
मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागात इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये (इन्स्पेक्टर ऑफ वर्क-आयओए) म्हणून काम करणाऱ्या सागरने इंग्लंड ते फ्रान्स हे २१ मैलाचे अंतर यशस्वी पार केले. या मोहिमेसाठी आठ बोटी निघाल्या. त्यात चार बोटींनी प्रस्तावित अंतर पार केले. त्यात तीन रिले बोटींचा समावेश होता. त्या बोटींनी १४.२६ मिनिटे, १६.०८ मिनिटे आणि १७.११ सेकंद अशी वेळ नोंदवली.
सागर याने वैयक्तिकपणे (सोलो) ही मार्गक्रमणा पूर्ण केली. त्यासाठी त्याची १४ तास ४८ मिनिटे अशी विक्रमी वेळ राहिली. सागरने यापूर्वीही अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. २००७ मध्ये त्याने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे ३५ किमी अंतर ७ तास ४५ मिनिटांमध्ये पार केले होते. त्याच वर्षी खुल्या समुद्रात ८१ किमी अंतर ११ तास ३८ मिनिटांमध्ये पोहून पार केले. त्यानंतर २०१८ मध्ये कॅटालिना खाडीमध्ये ३६ किमी अंतर १० तास २८ मिनिटांत पार केले.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…