रत्नागिरी : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून सांगतो, आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला. संजय राऊतांच्या या विधानावर आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ही आव्हान द्यायची वेळ नाही. त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे मतभेद कमी होतील, नेहमीच आव्हान देऊन काही होत नाही, अशा शब्दात भास्कर जाधवांनी संजय राऊतांना झापले.
राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत हे कमालीच्या आक्रमक पावित्र्यात दिसले. आम्ही जिंकणार, विधानसभेत विश्वास ठरावही जिंकू. या मंडळींनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
त्यावर आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी तेव्हाही सांगितले होते की, आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका, शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले. मात्र आपल्या कोट्यातील ३ मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली?, असा सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…