मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा नसल्यामुळे आठवडाभरात मुंबईवर पाणी कपातीची शक्यता आहे. पावसाळा सुरू झालेला असतानाही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा वाढण्याऐवजी त्यात घट होत आहे. सध्या या धरणांमध्ये केवळ ९.७६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जर धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
जून महिना संपायला आला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परीसरात पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या धरण साठ्यात कमालीची घट झाली आहे. धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे.
अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. पावसाळा सुरू झालेला असतानाही या तलावांतील पाणीसाठा वाढण्याऐवजी त्यात घट होत आहे. सध्या या धरणांमध्ये केवळ ९.७६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जर धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान याबाबत पालिकेचे जल अभियंता आढावा घेत आहेत. मुंबईला कसे पाणी पुरवता येईल? अथवा पाणी कपात केल्यास ती कशा प्रकारे करता येईल? याबाबत आढावा घेऊन आठवड्याभरात निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…