फडणवीसांचा करिश्मा कायम

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये भाजपला ५ जागांवर तर महाविकास आघाडीला ५ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने प्रसाद लाड यांच्यासाठी विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना कमी संख्याबळ असतानाही प्रसाद लाड विजयी झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा कायम असल्याचे राज्यसभेपाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणूकीतही पहावयास मिळाला आहे.


भाजपकडून राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उमा खापरे तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर हे पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळवून विजयी झाले आहेत.


काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे विजयी झाले असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप पराभूत झाले आहेत. विधान परिषद निवडणूक होण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाई जगताप यांनी उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन करताना भाई जगताप पराभूत होणार असल्याचे भाकित वर्तविले होते. महाविकास आघाडीला समीकरणाच्या गणितात भाजपने पुन्हा एकवार धोबीपछाड दिल्याने भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निकाल जाहिर होताच राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका