माणगावात सापडले आठ जिवंत गावठी बॉम्ब



  • पहाटेच्या सुमारास आदिवासी वाडीवर धाड




  • बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची कारवाई




  • ब्रुनो श्वानाची महत्वपूर्ण कामगिरी




अलिबाग (वार्ताहार) : माणगाव तालुक्यातील पाणसई इथे पोलीसांनी केलेल्या कारवाईत ८ जिवंत बॉम्ब हस्तगत केले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास करंजवाडी आदिवासी वाडीवर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने ही मोठी कारवाई केली.


पाणसई येथील करंजवाडी आदिवासी वाडीवर गावठी बॉम्ब असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासूनच या भागात फिल्डींग लावण्यात आली. पहाटे साडेचार वाजता तिथे धाड टाकून ८ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले. हे बॉम्ब जमिनीत पुरून ठेवण्यात आले होते.


या कारवाईत ब्रुनो नावाच्या श्वानाने महत्वाची कामगिरी बजावली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. भोईर, हेड कॉन्स्टेबल भूपेंद्र देसाई, संतोष राऊत, राहुल पाटील, शैलेश गोतावडे, जितेंद्र सातोडे यांनी या कारवाईत भाग घेतला.


डुक्कर किंवा तत्सम जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी तसेच मासेमारी करण्यासाठी हे बॉम्ब तयार करण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती हाती लागली आहे. हे आदिवासी स्वतःच असे बॉम्ब तयार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. बाबुराव दगडू यादव आणि राम यशवंत वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. माणगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

जेएसडब्लू स्टील तिमाही उत्पादन आकडेवारीनंतर शेअर्समध्ये १% वाढ

मोहित सोमण: जेएसडब्लू स्टील (JSW Steel Limited) कंपनीच्या तिमाही निकालातीव उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. यानंतर

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

शेअर बाजारात सलग नवव्या सत्रात घसरण अस्थिरतेचे भय बाजारात सुरुच! सेन्सेक्स १०३.२४ व निफ्टी ४५.४० अंकांने कोसळला

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत आजही शेअर बाजारात घसरणच सुरु आहे. सलग नवव्या सत्रात झाल्याने इक्विटी बेंचमार्क

अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात

‘ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध’

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाणेकरांना आश्वासन ठाणे : ''ठाणे आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रात वाहतुक कोडींचा प्रश्न

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा