योग दिन कार्यक्रमांसाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीची निवड

  91

नवी दिल्ली : देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांसाठी ७५ प्रतिष्ठित स्थळांची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे त्यापैकीच एक. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, २१ जून २०२२२ रोजी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे योग सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत.


आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. या वर्षी, 'मानवतेसाठी योग' या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतात आणि जगभरात आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मन की बात कार्यक्रमात याची घोषणा केली होती.


आपल्या प्रतिष्ठित स्थळांचे प्रदर्शन घडवत 'भारताची नाममुद्रा जागतिक स्तरावर' यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम कॉमन योगा प्रोटोकॉल (सीवायपी) या ४५ मिनिटांच्या प्रोटोकॉलच्या सामंजस्यपूर्ण सामूहिक योग प्रात्यक्षिकावर आधारित आहे.


यावर्षी, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रमुख आकर्षण ‘गार्जियन रिंग’ असेल. याद्वारे जगभरात होत असलेल्या योग सोहळ्यांचा दिवसभर प्रसार केला जाईल. “द गार्जियन रिंग” “एक सूर्य, एक पृथ्वी” ही संकल्पना अधोरेखित करते आणि योगची एकत्रित शक्ती दर्शवते.


नियमितपणे योगाभ्यास करण्याच्या आरोग्यदायी सवयीला प्रोत्साहन देत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विट केले. आजार टाळण्यासाठी आणि आनंद मिळविण्यासाठी, निरोगीपणावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगासने हा आपल्या जीवनाचा भाग बनवला पाहिजे असे त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.