सचिनसाठी अर्जुन झाला स्वयंपाकी

  88

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रविवारी जगभरात ‘फादर्स डे’साजरा होत असताना सामान्य नागरिकांपासून ते अनेक लोकप्रिय सेलिब्रिटिंनी आपापल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक सेलिब्रिटिंनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी आणि मुलांसाठी भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसुद्धा आजच्या दिवशी भावुक झाला आहे. सचिनच्या लेकाने त्याच्यासाठी स्वयंपाकाचे प्रयोग केले आहेत. खुद्द सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.


‘अर्जुनने आज बनवलेले स्क्रॅम्बल्ड एग्जला जगातील सर्वोत्तम चव आहे. त्याचा पोत आणि चव खूप चांगली होती! त्यामध्ये त्याचे प्रेम आहे…, यापेक्षा मौल्यवान काही असू शकत नाही,’ अशी पोस्ट सचिनने केली आहे. त्यासोबत त्याने अर्जुनसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे.


https://twitter.com/sachin_rt/status/1538496565815353344

त्यापूर्वी, सचिनने देखील आपल्या दिवंगत वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. ‘प्रत्येक मुलासाठी त्याचे वडिल हे त्याचे पहिले हिरो असतात. मीही त्यातलाच एक आहे. त्यांची शिकवण मला आजही आठवते. त्यांचे निस्वार्थ प्रेम आणि मला केलेले मार्गदर्शन मला आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा!’, अशी पोस्ट करत सचिनने एक व्हिडिओ शेअर केला होता.


https://twitter.com/sachin_rt/status/1538412577180463104
Comments
Add Comment

पनेवलमध्ये बालकाश्रमाजवळ बास्केटमध्ये बेवारस अवस्थेत आढळले अर्भक

पनवेल : तक्का परिसरातील स्वप्नालय नावाच्या संस्थेजवळ बास्केटमध्ये बेवारस अवस्थेत अर्भक आढळले. ही घटना शनिवार २८

Gold Rate Today: सोन्याचे दर सराफा बाजारात Crash ! सोने घसरणीचा नवा निचांक

प्रतिनिधी: आज सोन्याचे दर अक्षरशः 'क्रॅश' झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी सोन्याचा दरात ही झालेली मोठी घसरण म्हणावी

‘कांटा लगा…’ फेम शेफालीचे निधन, पोलीस तपास सुरू

मुंबई : तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sebi Raids: सेबीच्या इतिहासातील आणखी मोठी कारवाई! देशभरात ३०० कोटीहून मोठ्या 'Pump and Dump' घोटाळा संशयितांची चौकशी सुरू

प्रतिनिधी: ऑनलाईन शेअर बाजारात 'Buy Multibagger Stocks' अशा आकर्षक जाहिरातींबरोबरच अनैसर्गिकपणे बाजारातील किंमतीवर प्रभाव

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता