वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

  69

नागपूर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वीज कोसळण्याच्या ३ वेगवेगळ्या घटनांमध्ये ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. योगेश रमेश पाठे (२७, हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४) आणि बाबाराव मुकाजी इंगळे (६० दोघेही मुक्तापूर) अशी मृतकांची नावे आहेत.


यासंदर्भातील माहितीनुसार नरखेड तालुक्यातील हिवरमठ गावातील योगेश रमेश पाठे हा शेतकरी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात पेरणी करीत होता. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावरील दुचाकीजवळ पोहोचला. अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे १० दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याला वडील नसून मोठा भाऊ व आईसोबत राहायचा. त्याच्याकडे ५ एकर शेती आहे.


यासोबतच मुक्तापूर शिवारात पावसामुळे शेतातील झोपडीत दिनेश ज्ञानेश्वर कामडी व बाबाराव मुकाजी इंगळे हे दोघेजण बसले होते. विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज झोपडीवर कोसळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक दिनेशचे ५ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अधिक वेळ होऊनही शेतातून का परतले नाही म्हणून दिनेशचे वडील शेतात गेले असता दोघेही शेतातील झोपडीत मृतावस्थेत आढळून आले.


तसेच पिंपळगाव (राऊत) शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून बैलजोडी दगावली. घटनेची माहिती मिळताच नरखेड पंचायत समिती सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी भेट दिली. त्यानंतर तलाठी तारकेश्वर घाटोले, वसंत नासरे, राऊत यांनी तिन्ही घटनांची माहिती पोलीस व तहसीलदार जाधव यांना दिली. ठाणेदार मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.