तेव्हा महाराज त्या कुत्र्याकडे पाहून त्यांना म्हणाले, ‘अरे त्याचे पाव त्याला देऊन टाका.’ एवढे बोलण्याचा अवकाश, एक महान आश्चर्य घडले. त्या कुत्र्यांनी खाल्लेले पाव जसेच्या तसे ओकून टाकले. जरासुद्धा ते पाव ओले झाले नव्हते किंवा खराब झाले नव्हते. ते पाहून पाववाल्याने महाराजांची क्षमा मागितली आणि त्या घटनेनंतर मात्र वालावल गावात महाराजांची कोणी चेष्टा मस्करी किंवा थट्टापण केली नाही. राऊळ महाराज चमत्कार करीत नसत तर ते अगदी सहजासहजी घडत असे.
सहजाची कार्य जो निश्चित ।
बोले जे भक्त तैसे करी ।। १।।
हुकूम तयांचा मानूनी प्रमाण।
देती भक्तजन सर्व काही।। २।।
असा थोर योगी झाला
जो महंत।
अवतार निश्चित ईश्वराचा।।३।।
प. पू. राऊळ महाराज हे साक्षात परमेश्वराचा अवतार होते. ते कधी कुठे असतील त्याचा थांगपत्ता लागायचा नाही. आता वालवलला तर क्षणातत चेंदवणला असायचे. तर क्षणात पिंगुळीला, अशा प्रकारे श्रीकृष्णाने गोकुळात लीला करून दाखिवल्या व सर्व गौळणींना नादी लावले, तद्वतच राऊळ महाराज हे प्रतिकृष्णच होते.
श्री राऊळ बाबांच्या कृपेने नवरदेव मिळाला- एकदा महाराज वालवलच्या मास्तरांच्या घरी गेले होते, तर मास्तर घरात नव्हते. त्यांच्या सौभाग्यवतीने सांगितले, मास्तर तुम्हाला लग्नपत्रिका देण्यासाठी गेलेले आहेत. तुम्हीच सांगितले होते ना ‘मुलीक चांगलो नवरो मिळतलो म्हणून!’ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या मुलीला चांगला नवरा मुलगा मिळाला. मास्तर घरात नाही हे बघून महाराज वालावलहून जायला निघाले. तेव्हा महाराजांना कुडाळ एस.टी.स्टँडवर मास्तरांचा नवरामुलगा व मुलगी भेटली. असे हे राऊळ महाराज नाना खेळ खेळणारे व लोकांना करून दाखविणारे मायावी, अंतर्यामी, साक्षात्कारी थोर महंत होते.
– श्री समर्थ राऊळ महाराज