राष्ट्रपतीपदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल

  108

नवी दिल्ली (हिं.स.) : भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आणि विरोधक राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचा शोध घेत असतानाच देशातील ११ जणांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी बहुतांश हौशी उमेदवार असल्याची चर्चा आहे.


राष्ट्रपती पदासाठी आतापर्यंत १. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू, २. जीवन कुमार मित्तल, दिल्ली, ३. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, ४. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, ५. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू, ६. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार, ७. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली, ८. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली, ९. लालू प्रसाद यादव, बिहार, १०. ए. मणिथन, तामिळनाडू, ११. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील लालू प्रसाद यादव हे बिहारचे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नाहीत. यादीतील काही उमेदवारांची विविध कारणांनी चर्चा होत असते. यातील एका उमेदवाराचे नाव लिम्का बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.


तामिळनाडूमधील डॉ. के. पद्मराजन हे होमिओपॅथिक डॉक्टर असून व्यावसायिक आहेत. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मात्र, हे नाव 'सर्वाधिक अपयशी' उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले आहे.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एका दाम्पत्याने अर्ज दाखल केला आहे. मोहम्मद ए हामिद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या दाम्पत्याचे नाव असून ते मुंबईतील आहेत. या दाम्पत्याने यापूर्वी २०१७ मध्ये देखील निवडणूक अर्ज दाखल केला होता. यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे.


दिल्लीतून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यात उद्योगपती जीवन कुमार मित्तल यांच्या नावाचा समावेश आहे. जीवन कुमार मित्तल यांनी आतापर्यंत राष्ट्रपतींना ५ हजारांहून अधिक पत्रे लिहिली आहेत. याच कारणामुळे ते प्रसिद्धही आहेत. वर्ष २०१२ आणि २०१७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


राष्ट्रपती पदासाठी बुधवारी अर्ज दाखल केलेल्या ११ उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चूक झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक म्हणून प्रत्येकी ५० आमदार, खासदारांची स्वाक्षरी हवी असते. त्यामुळे छाननीमध्ये या सर्वांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या