जम्मू-काश्मीर शोपियानमध्ये दोन दहशतवादी ठार

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील कांजिलूर भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लश्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित जिहादी दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी मारले गेले.


पोलिसांनी दावा केला आहे की या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये इलाका-ए-देहाती बँकेचे व्यवस्थापक राजस्थानचे रहिवासी विजय कुमार यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा समावेश आहे. जान मोहम्मद लोन असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव तुफैल गनई आहे. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.


चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात आणखी दहशतवादी असल्याच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम सुरू आहे. या भागात आणखी दहशतवादी नसल्याची खात्री झाल्यानंतर, ऑपरेशन मागे घेण्यात येईल. या चकमकीनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दोन दहशतवादी ठार केल्याची माहिती दिलीय. यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले की, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियान येथील जान मोहम्मद लोन असे आहे. अलीकडेच कुलगाम जिल्ह्यात २ जून रोजी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येसह इतर दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.


जिल्ह्याच्या बाहेरील बेमिना येथे सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत पाकिस्तानी कमांडर अब्दुल्ला गोजरी आणि लश्कर-ए-तोयबाचा स्थानिक कमांडर मुसैब यांच्यासह दोन दहशतवादी ठार झाले. यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला. मारले गेलेले दोन्ही दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या लश्कर-ए-तोयबाच्या तीन सदस्यीय आत्मघातकी पथकाचा भाग होते. या पथकातील हंजला हा पाकिस्तानी दहशतवादी ६ जून रोजी सोपोरमधील जालुरा येथे चकमकीत ठार झाला होता.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व