Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडादहा महिन्यानंतर नीरज चोप्रा मैदानावर उतरणार

दहा महिन्यानंतर नीरज चोप्रा मैदानावर उतरणार

नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी करण्यासाठी सज्ज झाला आहे. फिनलंडमध्ये होणाऱ्या पावो नूरमी गेम्स २०२२ या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असेल. फिनलंडमधील तुर्कू येथील पावो नूरमी स्टेडियममध्ये पावो नूरमी गेम्स २०२२ ची सुरुवात होणार आहे. पावो नूरमी गेम्स ही स्पर्धा ही जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील दुसरी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे. डायमंड लीगनंतर पोवो नूरमी गेम्सचा क्रमांक लागतो.

नीरज चोप्रा व्यतिरिक्त, ग्रेनेडाचा विद्यमान जगज्जेता अँडरसन पीटर्स, टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज आणि लंडन २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉल्कोट हे पुरुषांच्या १०-अॅथलीट भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चोप्राचा कट्टर प्रतिस्पर्धी व जर्मन खेळाडू जोहान्स वेटरदेखील तुर्कू येथील स्पर्धेत सहभागी होणार होता. परंतु, त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचे देशबांधव ज्युलियन वेबर आणि अँड्रियास हॉफमन मात्र या ठिकाणी येणार आहेत.

टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा जवळपास १० महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरणार आहे. मैदानात आल्यानंतर त्याला जगातील दिग्गज भालाफेकपटूंचा सामना करावा लागणार आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेमध्ये पीटर्स आणि वडलेच या दोघांनीही ९० मीटरचा टप्पा पार केलेला आहे. पीटर्सने दोहा येथे ९३.०७ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. या हंगामातील हा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.

नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत येण्याचा प्रयत्न करेल. तुर्कूनंतर, नीरज चोप्रा फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगसाठी स्वीडनला रवाना होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -