उल्हासनगरात अनधिकृत होर्डिंग, बॅनरबाजीला बसणार चाप

सोनू शिंदे


उल्हासनगर : उल्हासनगर शहराची विद्रुपीकरणातून सुटका करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून यापुढे अनधिकृत होर्डिग्ज, बॅनर बाजीला चाप बसवण्यासाठी थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


उल्हासनगरात राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्यक्रमांचे शुभेच्छांचे होर्डिग्ज बॅनर नेहमीच झळकत असतात. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यात पालिकेची २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने राजकिय पक्षांसोबत नविन चेहऱ्यांना संधी, प्रती स्पधींचे होर्डिग्ज, बॅनर आत्तापासूनच झळकायला सुरुवात झाली आहे.


त्यामुळे महापौर लीलाबाई आशान यांनी त्यांच्या दालनात आयुक्त डॉ. राजा दयानिधी, पदाधिकारी, गटनेते यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी अनधिकृत होडिंग्ज, बॅनर, पोस्टर लावण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागातून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा जे अनधिकृत आहेत. अशांवर सबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे आदेश महापौर लीलाबाई आशान यांनी दिले.


त्यानुसार आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी चारही प्रभागातील सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, अजित गोवारी, महेंद्र पंजाबी यांना अनधिकृत होडिंग्ज बॅनर बाजांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश जारी करणार आहेत.


यावेळी बैठकीला उपमहापौर भगवान भालेराव, सभागृह नेते भारत गंगोत्री, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, अरुण आशान, कलवंतसिंग सोहता, मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश सीतलानी, मालमत्ता व्यवस्थापक विशाखा सावंत, गटनेते जमनादास पुरसवानी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या