महाराजांची भटकंती बहुतेक वेळा अनवाणीच असून ते पायीच प्रवास करीत. कित्येकदा त्यांच्या पायात काटे बोचत, दगड धोंडे लागायचे पण महाराजांना कोणत्याच प्रकारचे दु:ख नसायचे. त्या गावात सूर्यकांत वालावलकर नावाचा परमप्रिय भक्त होता. तो ठाण्याला नोकरीच्या निमित्ताने राहत होता. पण कोणत्याही उत्सवाच्या वेळी मात्र तो वालावल गांवी यायचाच व आल्यानंतर तो महाराजांच्या सेवेतच आपला सर्व वेळ घालवित असे. एकदा या वालावल गावी महाराजांनी एक विचित्र घटना घडवून आणली. महाराज वालवलच्या तळ्यात आंघोळ करून ते नारायण मंदिराकडून तेथील देव रवळनाथ मंदिराकडे आले. त्यांच्या मागून चार-पाच कुत्री होती. तेवढ्यात तिथे त्यांना वाटेत पाववाला दिसला. त्याच्याकडून बाबांनी पाव घेतले व कुत्र्यांना घातले व लगेच रूद्रावतार धारण करून शिव्या देत पुढे चालले. तेवढ्यात मागाहून येणाऱ्या मंडळींनी त्या पाववाल्याला महाराजांकडून पैसे घेण्यासाठी सुचविले. तेव्हा तो पाववाला महाराजांकडे पैसे मागू लागला.
महाराज आंघोळ करून आल्यामुळे ओलेचिंब होते. ते त्याला म्हणाले, ‘तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. हवे तर तुला फेटा किंवा कोट देतो.’ त्यावर पाववाला रागानेच म्हणाला,‘ पैसे नाहीत तर माझे पाव मला परत द्या.
– राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!