Saturday, October 25, 2025
Happy Diwali

भाईंदरच्या महिलेची आफ्रिकेतून सुटका

भाईंदरच्या महिलेची आफ्रिकेतून सुटका

भाईंदर : भाईंदर येथे राहत असलेल्या वर्षापूर्वीच विवाह होऊन आफ्रिकेत राहण्यास गेलेल्या नवविवाहितेला त्रास देण्याऱ्या तिच्या नवऱ्यापासून सुटका करून भाईंदर येथील आईकडे सुखरूप पोहचविण्याचे काम भाईंदर पोलिसांनी केले आहे.

मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत भरोसा सेल (गुन्हे शाखा) येथे एका महिलेने तक्रार अर्ज करुन माहिती दिली की, तिच्या मुलीचे एक वर्षापुर्वी लग्न झाले, दिड महिन्यांपूर्वी तिचा जावई नोकरी निमित्त मुलीसह सेंट्रल आफ्रिका येथे गेला. सेंट्रल आफ्रिकेला पोहचल्यानंतर जावयाने फोन करून सुखरूप पोहचल्याचे कळविले. त्यांनतर जावयाने त्याचा स्वतःचा फोन बंद करून ठेवला तसेच मुलीकडील मोबाईल काढून घेतला.

तेव्हापासुन त्यांच्या मुलीशी संपर्क तुटला होता. काही दिवसांनी तिने घरकामासाठी येणाऱ्या महिलेच्या मोबाईल वरून आईशी संपर्क साधून नवरा रोज मारहाण करत असल्याचे सांगितले. तसेच तिला घरातच कोंडून ठेवले आहे. तिने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. या अर्जावर भरोसा सेलच्या सपोनि तेजश्री शिंदे यांनी गंभीर विचार केला.

पोलिस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शन घेऊन सचिन तांबवे, मपोशि आफ्रिन जुन्नैदी यांच्या सहकार्याने भारतीय राजदूत, डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ कॉन्गो, गबान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक यांना पत्रव्यवहार करून पीडित महिलेची सुटका केली. नंतर तांत्रीक बाबींची पुर्तता तसेच कोवीड-१९ ची तपासणी करून तिला विमानाने परत मुंबईत आणले. कौटुंबिक हिंसाचारा अंतर्गत भारतीय महिला नागरिकास परदेशातून परत भारतात आणण्याची ही पहिलीच घटना आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा