आता सर्पदंश झाल्यास आरोग्य केंद्रातच मिळणार त्वरित उपचार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील गाव, वाड्या-पाड्यांवर असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये सर्प दंशावर योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाला शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यादरम्यान, त्याचा वाटेतच मृत्यू ओढवतो. अनेक वेळा प्रशिक्षित कर्मचारी आरोग्य केंद्रात नसल्याने रुग्णाला उपचारासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवावा लागतो.


मात्र आता ही वेळ यापुढे येणार नसून तालुक्यातील आरोग्य केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सर्पदंश झालेल्या रुग्णाला तत्काळ उपचारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आरोग्य विभागाने गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्प दंशाची आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषध, गोळ्यांचा पुरेसा साठा देऊन, या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.


प्रत्येक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा, प्रशिक्षित मनुष्यबळ आहे की नाही याची चाचपणी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तालुक्यांमधील आरोग्य केंद्रांचा या सेवांमध्ये समावेश आहे.


दरम्यान, गेल्या दीड वर्षात शहापुरात ५०५ ग्रामस्थांना सर्प दंश झाला. २२४ जणांना विंचवाने दंश केला होता. या दंशांनी एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाची इंजेक्शन उपलब्ध असतात. तेथेच दंश झालेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित असते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे