पॉक्सो, विनयभंगाच्या गुन्ह्यात डीसीपींची परवानगी घ्यावी लागणार

मुंबई : पॉक्सो किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.


पांडे यांनी नुकताच एक आदेश जारी करून सांगितले आहे की, जुन्या वादातून, मालमत्तेच्या वादातून किंवा अन्य कोणत्याही वैमनस्यातून पोलीस ठाण्यात पॉक्सो किंवा विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा आरोपी निर्दोष ठरतो. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्याची बदनामीही होते. यासाठी प्रथम सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) हे अशा कोणत्याही तक्रारीची चौकशी करतील आणि नंतर अंतिम आदेश डीसीपी देतील, त्यानंतर गुन्हा दाखल करा.



पॉक्सो कायद्याचा होणाऱ्या गैरवापरामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पॉक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे.


तसेच जुनी भांडण, प्रॉपर्टीचे वाद, वैमनस्य अशा अनेक कारणांमुळे पोलिस स्थानकात खोट्या तक्रारी झाल्या आहेत. नंतर चौकशीनंतर आरोपी निर्दोषी आढळतो. परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अशा प्रकरणात आरोपीची मोठी बदनामी झालेली असते. यामुळे आयुक्त संजय पांडे यांनी आदेश जारी करताना म्हणाले आहेत की, या पुढे पॉक्सो किंवा विनयभंगाची तक्रार आल्यास अगोदर योग्य चौकशी करून खातरजमा झाल्यानंतरच उपायुक्त दर्जाचा अधिकारी अंतिम निर्णय देतील.

Comments
Add Comment

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या