मुंबई : सिद्धू मूसेवाला हत्याकांडामध्ये सामील असणाऱ्या आरोपीला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी सिद्धेश कांबळे उर्फ महाकाळ यास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ओंकार बानखेले खून प्रकरणात आरोपी असलेला संतोष जाधव याला लपण्यास कांबळेने मदत केली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन निष्पन्न झाले होते. मुसेवाला हत्या प्रकरणातील १० शॉर्प शुटरपैकी दोघे जण पुणे जिल्ह्यातील होते. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी सिद्धेश कांबळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरला त्याची सासुरवाडी आहे. जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार आहे.
सिद्धु मुसेवाला हे २९ मे रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावातुन त्यांच्या कारमधून जात होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करीत टोळक्याने त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची खुन केली होती. या घटनेचे पंजाबमध्ये तीव्र पडसाद उमटले असतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, दिल्लीतील गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने त्याच्या सहकाऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची केल्याचे त्याच्या चौकशीतुन पुढे आले. हत्या करणाऱ्यांमध्ये पंजाबमधील ३, राजस्थानातील ३ व पुण्यातील संतोष जाधव व सौरभ महाकाळ या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.