कुपवाडा चकमकीत दोन दहशतवादी ठार

Share

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मारल्या गेलेले दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या प्रतिबंधीत जिहादी संघटनेशी संबंधीत होते. तसेच यापैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली.

सुरक्षा दलांना कुपवाडा येथील चक्रकंडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि 2 दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. यापूर्वी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला होता. तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, 5 मॅगझिन आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत 2020 मध्ये 221 आणइ 2021 मध्ये 193 दहशतवादी ठार करण्यात आले होते तर यावर्षी 6 जूनपर्यंत 96 दहशतवादी मारले गेले आहेत.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

3 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

4 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

5 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

8 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

8 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

8 hours ago