विक्रमगड तालुक्यामध्ये शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त

पटसंख्या घसरली, अध्यापनात अडचणी


विक्रमगड : कोरोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षणाची तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागावर आहे. विक्रमगड तालुक्यात ७८२ मंजूर पदांपैकी तब्बल १९७ पदे रिक्त असून शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्याही घसरत आहे तसेच शिक्षणाचा दर्जाही कमी होतो आहे.


विक्रमगड तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे अध्यापनात अडचणी येत आहेत. याचा सामना शिक्षक, अधिकारी व विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या २३५ शाळा असून त्यात साधारण १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात ७८२ मंजूर पदांपैकी तब्बल १९७ पदे रिक्त आहेत. ३५ मुख्याध्यापक पदापैकी २२ पदे रिक्त असून केंद्रप्रमुखांच्या १६ पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.


विस्ताराधिकारी ही सात पदे मंजूर असून त्यातील केवळ एक पद भरले असून सहा पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांची ८२, सहशिक्षकांची ७७ पदे रिक्त आहेत. हा शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे चालतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे पटसंख्याही कमी होत आहे. दर्जा वाढविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक देणे अपेक्षित आहे, असे येथील किरण गहला यांचे मत आहे. तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याससंबंधी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी ईश्वर पवार यांनी दिली.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील