पाच वर्षांनंतर साक्षीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण

अल्माटी : भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने पाच वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला. तिने संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेच्या मानांकन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या मानसी व दिव्या काकरन यांनीही सुवर्ण कामगिरी केली.


२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत प्रकाशझोतात आलेल्या साक्षीला त्यानंतर कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. मात्र, नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत तिने चांगली कामगिरी केली. त्यापाठोपाठ तिला ‘यूब्ल्यूब्ल्यू’ मानांकन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले.


६२ किलो वजनी गटातील अंतिम लढतीमध्ये साक्षीने आक्रमक शैलीत आणि चपळाईने खेळ केला. या लढतीत सुरुवातीला तिची प्रतिस्पर्धी इरिना कुझनेत्सोव्हाकडे ५-३ अशी आघाडी होती. मात्र, साक्षीने जोरदार प्रतिहल्ला केला आणि ७-४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर साक्षीने कुझनेत्सोव्हाला चितपट करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना