मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून पुण्याला व पुण्याहून मुंबईला दोन तासात पोहचणे शक्य झालेले असतानाच आता रेल्वेनेही अडीच तासात मुंबईहून पुण्याला प्रवास करणे अवघ्या दीड महिन्याने शक्य होणार आहे. लवकरच महाराष्ट्राला पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन मिळणार आहे. याद्वारे आपल्याला मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त २ तास ३० मिनटांत करता येणार आहे. १५ ऑगस्ट पर्यंत २ गाड्या महाराष्ट्राला मिळू शकतात.
१५ ऑगस्ट पर्यंत वंदे भारत ट्रेन मुंबई पुणे यादरम्यान धावणार असल्याची माहिती दिली आहे. आता उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई ते पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास अडीच तासावर येणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतात दोन महत्त्वाच्या शहारातील प्रवास वेगवान व्हावा यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येतात. येत्या दोन वर्षात तब्बल ४०० वंदे भारत ट्रेन संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये वाराणसी-नवी दिल्ली, वैष्णोदेवी-नवी दिल्ली या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. त्यामध्ये आता महाराष्ट्रातील मुंबई-पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन येण्याची शक्यता आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…