मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड गायक केके यांच्यावर गुरुवारी मुंबई येथील वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केके (कृष्णकुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी वयाच्या ५३व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. त्यांचे पार्थिव कोलकात्याहून बुधवारी रात्रीच्या सुमारास मुंबईत आणले गेले. गुरुवारी वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
केके यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.केके यांचे पार्थीव गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे बारा वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर अंधेरीस्थित त्यांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. केके यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील केके यांचे जवळचे मित्र आणि सेलिब्रिटी हजर होते.
यावेळी सुदेश भोसले, अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक यांच्यासह अनेक कलाकारांनी केके यांच्या घरी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…