Thursday, July 3, 2025

भक्तांना स्वप्नात दर्शन

विलास खानोलकर


श्रीबाबा आपल्या भक्तांना नित्य मार्गदर्शन करीत, तर दूरच्या भक्तांना आवश्यकतेनुसार स्वप्न दृष्टांतात सूचना देत. रॅली ब्रदर्स नावाची एक मोठी ग्रीक व्यापारी कंपनी होती. भारतात अनेक शहरात तिच्या पेढ्या होत्या. त्यापैकी मुंबईतील पेढीवर लखमीचंद नावाचे गृहस्थ मुनशीचे काम करीत असते. “माझा भक्त कितीही दूर असला तरी मी त्याला प्रेमाने माझ्याजवळ आणतो.’’ असे बाबा नेहमी म्हणत, अनेक भक्तांचा तसा अनुभवही होता. ध्यानीमनी नसताना त्यांना बाबांच्या दर्शनाचा योग यायचा आणि त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त होऊन ते धन्य व्हायचे. लखमीचंद हे त्यापैकीच एक होत. ते सांताक्रूझला राहत असत. एके दिवशी त्यांना स्वप्न पडले. त्यात एक वृद्ध साधू भक्तांच्या घोळक्यात उभा असलेला दिसला.


लखमीचंदांनी त्याला नमस्कार केला. जाग आल्यावर या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा त्यांनी आपल्यापरीने प्रयत्न केला. पण अर्थबोध झाला नाही. काही दिवसांनी लखमीचंदांनी यांना दासगणूंच्या कीर्तनास जाण्याचा योग आला. ते साईबाबांची तसबीर पुढे मांडून कीर्तन करीत असत. ती तसबीर पाहून लखमीचंदांना आपल्या स्वप्नातील साधू आठवला आणि ते श्रीसाईबाबाच होते याची खूण पटली. नंतर काही दिवसांतच ते शिर्डीला जाऊन साईंचे दर्शन घेऊन अतिप्रसन्न झाले व साईभक्त झाले.


साई म्हणे आली जरी जगबुडी
वाचवेन मी तुला मारुनी बुडी ।। १।।
वाचवेल साईनाम उदी
कणाकणात जगभर उदी ।। २।।
क्षणात पोचते साई उदी
हिमालयातल्या शंकरापदी ।। ३।।
जाशील तेथे पदोपदी
सांभाळेन मी साईभक्त गादी ।।४।।
नको मला सोने-नाणे
फक्त प्रेमाने मजकडे पाहणे ।। ५।।
डोळ्यांतच आहे माझ्या जादू
प्रेम ओथंबून लागे लादू ।। ६।।
लागशील तू ईश्वर भजनी
उभा मी तेथे सहस्त्र भोजनी ।। ७।।
नाही ज्याला आई-बाबा
उभा असे तेथे साईबाबा ।। ८।।
करा सेवा आईबाबा
उभा आहे तेथे साईबाबा ।। ९।।
दिली पुंडलीके वीट विठोबा
प्रत्येक सेवेत उभा साईबाबा ।। १०।।
श्रावण बाळाच्या खांद्या कावडी
गरीबसेवा श्रीरामा आवडी ।।११।।
वाचविण्या संकट हनुमंत उडी
साईनाम घे जोपर्यंत शरीरात कुडी ।। १२।।
वाट पाहतो मी सात समुद्रापार
वाट पाहतो मी सात स्वर्गापार ।। १३।।
साऱ्या शत्रूंना करेन गपगार
नाम घेता साईचे दर गुरुवार


[email protected]

Comments
Add Comment