ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून येथील नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, गरीब कल्याण संमेलन अंतर्गत सिमला येथे पंतप्रधानांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात दीक्षा खांबळे, निवृत्ती मगर, श्रावण निर्गुडा, रमेश मार्तंड, संजितकुमार, सुशीलाबाई, आदर्श साबळे, धनश्री माने, सीताबाई मुकणे, शिल्पा पाटील, चंद्रकांत गायकर या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
ठाणे जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमास आमदार रमेश पाटील, गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना भांडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, तहसीलदार राजाराम तवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…