रिक्त जागामुळे अंगणवाडी सेविकांचा वाढला ताण

जव्हार (प्रतिनिधी) : लहान बालकांपासून गरोदर महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते आवश्यक संतुलित व समतोल आहार यांचे सुयोग्य नियोजन करून तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न अंगणवाडी सेविका करीत असतात. मात्र अंगणवाडी सेविकांच्या तीन, मदतनीसांच्या सहा तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या दोन अशा ११ जागा रिक्त असल्याने अंगणवाडी सेविकांवर कामाचा ताण वाढला आहे.


अंगणवाडी सेविकांना अनेक कामे दिली जात आहेत. शून्य ते सहा वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते. गरोदर मातांची माहिती संकलित करावी लागते. कामाच्या तुलनेत मानधन कमी आहे. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त जागा आहेत, अशा जागा भरल्यास अतिरिक्त असणारा ताण कमी होऊन अजून चांगल्या प्रकारे सेवा करता येईल. जि. परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दोन दिवसांपूर्वीच तालुक्याचा आढावा घेतला, मात्र यात त्यांना मानधन तथा इतर अडचणी दिसल्या नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


जव्हार तालुक्यात दोन प्रकल्प आहेत. प्रकल्प १ मध्ये १५३ केंद्र, प्रकल्प २ मध्ये १९१ केंद्र असून तालुक्यात एकूण ३५४ अंगणवाडी आहेत. सर्व ठिकाणी अमृत आहार अंगणवाडीतच देणे सुरू आहे. गरोदर माता १४८७, स्तनदा माता १४७४, लहान बालके ३ वर्षापर्यंत ६६३६ मोठी ३ ते ६ वर्षांची बालके, ७८०३ इतकी आहेत. मानधन कमी तसेच वेळेवर मिळत नाही. दोन महिन्यांचे वेतन एकदाच मिळते, असे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.


जव्हार तालुक्यात अंगणवाडी प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. रिक्त जागा भरण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा केली आहे. मानधन नियमितपणे मिळावे यासाठी दोन्ही प्रकल्पाला सूचना केल्या आहेत. शिवाय जिल्हास्तरावर देखील हो बाब निदर्शनास आणली आहे. - सुरेश कोरडा, सभापती, पंचायत समिती, जव्हार

Comments
Add Comment

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना