केडीएमसी निवडणुकीसाठी महिलांसाठी आज आरक्षण सोडत

कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


मंगळवारी ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण (पश्चिम) येथे सदर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.


बुधवारी १ जून रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार असून आरक्षणाबाबत हरकती व सूचना (महापालिका आयुक्त यांच्या नावाने) बुधवार दिनांक १ जून २०२२ ते सोमवार दिनांक ६ जून २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महापालिका भवन, तळमजला, शंकरराव चौक, (कल्याण पश्चिम) अथवा संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे