राज्यसभेसाठी आघाडी विरुद्ध भाजप मुकाबला अटळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातल्या विधानसभा सदस्यांकडून राज्यसभेवर निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उभे ठाकल्यामुळे आता सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी, असा सामना आज तरी अटळ आहे. आज या निवडणुकीच्या आखाड्यात भाजपचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्या-त्या उमेदवाराच्या पक्षाचे नेते उपस्थित होते.


शिवसेनेकडून रविवारी संजय राऊत आणि संजय पवार या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत तरी सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. सध्याच्या पक्षीय बलानुसार भारतीय जनता पार्टीचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार दिला आहे.


या सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते; परंतु शिवसेनेने त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे, तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम, हे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

Comments
Add Comment

सरकारी कर्मचारी आता झोहो ईमेल प्लॅटफॉर्मवर, १२ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे अकाउंट झोहोवर

मुंबई : पंतप्रधान कार्यालयासह केंद्र सरकारमधील सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांचे ई-मेल पत्ते आता राष्ट्रीय माहिती

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने