मुंबईत २६९ शाळा अनधिकृत, महापालिकेकडून होणार कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका क्षेत्रात २६९ शाळा अनधिकृत असल्याची माहिती पालिकेने आपल्या संकेत स्थळावर दिली आहे. तर गेल्यावर्षी २८३ शाळा या अनधिकृत यादीमध्ये होत्या. यापैकी ४ शाळांना राज्य शासनाद्वारे ‘स्वयंअर्थसहाय्यित’ तत्त्वावर परवानगी देण्यात आलेली आहे. तर, ४ शाळांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान यांची मान्यता प्राप्त झालेली आहे.


या व्यतिरिक्त गेल्यावर्षीच्या यादीतील ११ शाळा बंद झालेल्या आहेत. यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुधारित यादीमध्ये १९ शाळांना वगळण्यात आले आहे. तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या यादीमध्ये नव्याने आढळून आलेल्या ५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.


दरम्यान, मुंबईतील प्राथमिक शाळांना शासनाची तसेच स्थानिक प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक असते. मात्र ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ कायद्यानुसार शासन/स्थानिक प्राधिकरणाची मान्यता न घेणाऱ्या अनधिकृत शाळांना पालिकेकडून नोटीस देण्यात येते. त्यानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी देखील या शाळांना शासनाची परवानगी आणणे अथवा शाळा बंद करण्याबाबतची नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच या शाळांना कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


मुंबईतील एकूण २६९ अनधिकृत शाळांची यादी सन २०२२-२०२३ करीता तयार करण्यात आलेली असून, ती 'ब' महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या तपशीलानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पालिका क्षेत्रातील ज्या शाळांचा समावेश अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये आहे, त्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यात येऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे करण्यात आले आहे. तर अनधिकृत शाळांकडून दंड वसूल करण्याबाबत शाळांच्या यादीसह विनंतीपत्र मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना पाठवण्यात येत असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.