
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यासाठी जंगी समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मैदानात एक भव्य अशी जर्सी आयपीएलतर्फे सादर करण्यात आली असून जगातील सर्वात मोठ्या मैदानात ही सर्वात मोठी जर्सी सादर करण्यात आल्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये देखील करण्यात आली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला गेला.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना झाला. पण तत्पूर्वी याच ठिकाणी आयपीएल २०२२ चा समारोप सोहळा अर्थात क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलीवुड सेलिब्रिटींपासून ते अनेक दमदार कलाकारांनी कार्यक्रम सादर केले.