स्कूल बसमध्ये जीपीआरएस बसवणे बंधनकारक

Share

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील स्कूल बस नियमावलीची सक्ती तातडीने करण्यासंदर्भातील सूचना अप्पर पोलीस महासंचालकांनी परिवहन विभागाला दिल्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विनंती पत्रानंतर, स्कूल बसची नियमावली कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील पोदार शाळेतील विद्यार्थी शाळा सुटून पाच तास झाले, तरी घरी न पोहोचल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सांताक्रुझमधील पोदार शाळेची ही बस होती. शाळा सुटल्यानंतर, ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण पाच तासांनंतरही विद्यार्थी घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंधरा दिवसांमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरु असलेल्या बस सेवांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भविष्यात असे प्रसंग उद्धवू नये, म्हणून बसमध्ये जीपीआरएस बसवणे स्कूल बस मालकांना बंधनकारक असणार आहे. यासोबतच बस चालक आणि मदतनिसांची पोलीस पडताळणी बंधनकारक असेल.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

7 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

8 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

8 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

8 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

9 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

10 hours ago