चोरी केलेल्या पाच रिक्षा आणि मोटार सायकल पोलिसांकडून हस्तगत

डोंबिवली : रिक्षा आणि मोटार सायकल चोरून त्या विकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून एकूण ५ रिक्षा आणि ५ मोटार सायकल असा एकूण ५ लाख ३ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे.


डोंबिवली पूर्व विभाग कांचनगाव येथे वास्तव्य करणारा आकाश ढोणे (१९) असे आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलिसांतर्फे तयार करण्यात आलेल्या पथकांनी ज्या भागातून मोटार वाहने चोरी झालेली आहेत त्या भागात गस्त घालून संशयित इसमावर पाळत ठेवली होती. त्यानुसार संशयित आरोपी आकाश पोलिसांच्या नजरेस पडला.


चोरलेल्या रिक्षा व मोटारसायकली त्याने डोंबिवली पूर्व येथील निळजे गाव परिसरातील माऊली तलावाच्या बाजूस असलेल्या झाडाझुडपात तसेच डोंबिवली पूर्व परिसरातील खंबाळपाडा मॉडेल कॉलेजच्या मैदानातील झाडाझुडपात लपवून ठेवल्या असल्याचे कळून आले.


या सर्व रिक्षा व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे